बाॅलीवूडच्या स्टार अभिनेत्याची पत्नी आहे गर्विष्ठ?

सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल,  इतर मुलींची खिल्ली उडवायची म्हणत टीका, क्लासमेटचा उल्लेख करत

मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत यांची जोडी ही लोकप्रिय सेलिब्रिटी कपल्सपैकी एक आहे. त्या दोघांचं लव्ह मॅरेज नसून त्यांचं अरेन्ज मॅरेज आहे. पण नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून मीरा गर्विष्ठ असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीरा ही गर्विष्ठ असल्याचं सांगितलं. त्या व्यक्तीनं सांगितलं की तो गॅलरी बूथच्या इंडिया आर्ट फेयरमध्ये काम करायचा आणि मीरा देखील त्याच्यासोबत तिथे काम करायची. मुलानं पुढे सांगितलं की दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि त्यानं तिच्याकडे पाहूण स्माईल दिली पण मीरानं त्याच्यावर डोळे फिरवले. तिनं असं दाखवलं की तिनं काही पाहिलंच नाही. हे यूजर मीरासोबत लेडी श्री राम कॉलेजमध्ये होता आणि ती खूप गर्विष्ठ आणि वाईट असल्याचं सांगितलं. त्यानं सांगितलं की ज्या मुली गरीब आहेत त्या मुलींची ती खिल्ली उडवायची. त्यांच्या कपड्यांची, केसांची आणि त्यांची इंग्रजी बोलण्याची पद्धतीची खिल्ली उडवायची. युजर पुढे लिहितो की,”मीरा गर्विष्ठ असल्याचं आणखी एक उदाहरण आहे. माझी मैत्रीण जी दिल्लीतील एरोसिटीमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करत होती. मीरा आणि शाहिद त्या हॉटेलमध्ये जर्सी सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी थांबले होते. माझी मैत्रीण मला म्हणाली की मीराने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत दीड हजार रुपयांच्या बिलवरुन वाद घातला. तसंच ती त्यांच्यासोबत अतिशय उर्मटपणे वागली. याउलट शाहीद मात्र विनम्र होता. त्याने कर्माचाऱ्यांसोबत फोटोही काढले. ” अशी पोस्ट करत युजरने खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान मीरा किंवा शाहीद यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत यांनी ७ जुलै २०१५ ला लग्न केले मीरा शाहीदपेक्षा १३ वर्षांनी छोटी आहे. तरी दोघांची जोडी एकदम छान वाटते. त्यांना दोन मुलं असून मीशा आणि जैन अशी त्यांची नावं आहेत. मीरा ही नेहमीच शाहिदला पाठिंबा देताना दिसते त्यामुळे नेहमीच तिचं कौतूक करण्यात येतं.