सोन्याच्या किमतीत घसरण की तेजी? आजचा भाव काय?

सोन्याबरोबर चांदीही खातेय भाव, आजचे दर का?, एका वर्षभरात सोने ‘एवढे’ महागले

मुंबई – सोन्याच्या भावात अलीकडे मोठे फेरबदल दिसून येत आहेत. कधी सोने महाग होते तर कधी स्वस्त होते. जागतिक बाजारातील अनिश्चितेमुळे सोन्याचे दर सतत बदलत आहेत. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण होत चालली आहे.

भारतात आज २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचा दर ९२,७९० रुपये, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचा दर १,०१,३२० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचा दर ७५,९२० रुपये आहे. भारतात काल २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचा दर ९२,८९० रुपये, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचा दर १,०१,३४० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचा दर ७६,००० रुपये होता. चांदीनेही चांगलीच उचल खाल्ली असून आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम ११६.२० रुपये आणि प्रति किलोग्रॅम १,१६,२०० आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम ११६.१० रुपये आणि प्रति किलोग्रॅम १,१६,१०० होता. सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा जास्त कल असतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आजही सोन्याचे दर घसरले आहेत. दरम्यान सराफा बाजारात या वर्षी सोने सुमारे २४२३१ रुपयांनी आणि चांदी २९०८३ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २४ रोजी सोने ७६०४५ रुपये प्रति १० आणि चांदी ८५६८० रुपये प्रति किलोने उघडली. या दिवशी सोने ७५७४० रुपयांवर बंद झाले. चांदी देखील ८६०१७ रुपये प्रति किलोने बंद झाली होती.

सोन्याविषयी भारतीयांना विशेष आकर्षण आहे. गेल्या ७८ वर्षात सोन्याच्या मोठी वाढ झाली आहे. १९४७ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत फक्त ८८ रुपये होती, आज ती १ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. म्हणजे सोन्याच्या किमतीत सुमारे ११३६ पट वाढ झाली आहे.

टीप – सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या जवळच्या ज्वेलर्सशी संपर्क साधा.