मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री या सुपरस्टारच्या प्रेमात?

Oplus_0

सुपरस्टार महाराष्ट्राचा जावाई होणार, व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधान, अभिनेत्री म्हणते नजर लागते म्हणून…..

मुंबई – फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांचे अफेअर्स-ब्रेकअप, लग्न-घटस्फोट हे कायमच चर्चेत असतात. कोणता अभिनेत्या कोणत्या अभिनेत्रीला डेट करत आहे. हे आजकाल लपून राहत नाही. त्यातच आता मराठमोळी अभिनेत्री एका दक्षिणेतील सुपरस्टारला डेट करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून साऊथ सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर डेटिंग करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो गेल्या महिन्यातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री कारमध्ये बसलेली दिसते आहे. तसेच, ती व्हिडिओमध्ये तिच्या चाहत्यांना विचारत आहे की त्यांनी तिच्या चित्रपटाची तिकिटे बुक केली आहेत का. यानंतर, अभिनेत्री धनुषच्या आगामी ‘इडली कढाई’ चित्रपटातील ‘एन्ना सुगम’ हे गाणे गाताना नाचताना दिसत आहे. १ ऑगस्टला मृणालच्या वाढदिवसाला धनुषने लावलेल्या उपस्थितीमुळे या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर तिने अलीकडेच केलेल्या ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला धनुष हजर होता, त्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सने मृणाल आणि धनुषच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं आहे. रिलेशनशिप नवीन असल्याने सध्या दोघांनाही ते जाहीर करायचं नसल्याने ते यावर बोलणार नाहीत असंही समजतंय. सध्या दोघांचाही मित्रपरिवार त्यांच्या एकत्र येण्याने खूप खूश आहे. दोघांचे विचार, मूल्ये एकमेकांशी खूप जुळतात. ते सोबत नक्कीच शोभून दिसतात अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनुषनं तिच्या बहिणीसोबत मृणालची भेट घडवूण आणली होती. दोघींनी या भेटीत छान गप्पा मारल्या, तसंच मृणाल धनुषच्या इतर कुटुंबियांनाही भेटली होती. “अजूनही खूप गोष्टी करायच्या आहेत. मी ते पूर्ण केल्यावरच त्याबद्दल बोलेन. कारण मला कुणाची नजर लागून घ्यायची नाही. खूप नजर लागते” असे मृणाल म्हणाली असल्यामुळे चर्चांना आणखीनच जोर चढला आहे.

धनुषने २००४ साली रजनीकांत यांची लेक ऐश्वर्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना लिंगा आणि यात्रा ही दोन मुलंही आहेत. २०२२ साली धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट झाला होता. धनुष आणि मृणाल यांच्यात ९ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल देखील केले जात आहे.