आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर हे दोन संघ भिडणार

आयपीएल मध्ये दहा वर्षानंतर ही गोष्ट पहिल्यांदा घडणार, २२ मार्चपासून १८ व्या हंगामाचा थरार

मुंबई – इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची आतुरतेने वाट पाहत असतात. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरु होणार आहे.

१८ वा हंगाम २२ मार्च रोजी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यातील सामन्याने सुरू होईल. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ मार्च रोजी दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना २३ मार्च रोजी एसआरएच आणि आरआर यांच्यात खेळला जाईल. यानंतर, दुसरा सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात होणार आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. सुरुवातीचे आणि अंतिम सामने दोन्ही कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होतील. लीग स्टेज फेऱ्या संपल्यानंतर आयपीएल २०२५ च्या प्लेऑफ सामने हैदराबाद आणि कोलकाता येथे खेळवले जातील. हैदराबादमध्ये अनुक्रमे २० मे २०२५ आणि २१ मे २०२५ रोजी क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामने होतील. त्यानंतर २३ मे २०२५ रोजी कोलकाता क्वालिफायर २ चे सामने होतील. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर १० वर्षांनंतर आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. याआधी, २०१५ मध्ये येथे शेवटचा आयपीएल फायनल आयोजित करण्यात आला होता. त्या अंतिम सामन्यात, मुंबई इंडियन्स (MI) ने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला हरवून जेतेपद जिंकले होते.

https://x.com/IPL/status/1891108307756015779?t=408BVqqDkBIcXdQGujJXbg&s=19

आजवरचे आयपीएल विजेते संघ

IPL 2008: राजस्थान रॉयल्स
IPL 2009: डेक्कन चार्जर्स
IPL 2010: चेन्नई सुपर किंग्ज
IPL 2011: चेन्नई सुपर किंग्ज
IPL 2012: कोलकाता नाइटरायडर्स
IPL 2013: मुंबई इंडियन्स
IPL 2014: कोलकाता नाइटरायडर्स
IPL 2015: मुंबई इंडियन्स
IPL 2016: सनरायझर्स हैदराबाद
IPL 2017: मुंबई इंडियन्स
IPL 2018: चेन्नई सुपर किंग्ज
IPL 2019: मुंबई इंडियन्स
IPL 2020: मुंबई इंडियन्स
IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज
IPL 2022: गुजरात टायटन्स
IPL 2023: चेन्नई सुपर किंग्ज
IPL 2024: कोलकाता नाइटरायडर्स