वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवा नाहीतर होईल ‘इतक्या’ हजाराचा दंड

सरकारकडून HSRP, नंबर प्लेट बसवण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत, तुमच्या वाहनाची नोंदणी करा नाहीतर…

पुणे – सरकारने २०१९ आधीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या तारखे अगोदर नोंदणी न केल्यास वाहनचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

सर्व नवीन वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. बनावट वाहन क्रमांकांची पाटी बसवून, वाहन क्रमांकाच्या पाटीवर करण्यात येणारी छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ०१.०४.२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या वाहनधारकांनी अजूनही ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवले नाहीत त्यांना बसवावी लागणार आहे. ३० एप्रिल २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा तुमच्याकडून पाचशे ते पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

एचएसआरपी बसवण्याच्या अलिकडच्या अंतर्गत आढावामध्ये असे दिसून आले आहे की १.१५ कोटी नोंदणीकृत वाहनांपैकी १.०५ कोटी वाहनांमध्ये एचएसआरपी बसवलेले आहे तर ९.९८ लाख वाहने त्याशिवाय धावत आहेत.