मैत्रिणीबरोबर राहणार्‍या पतीला पत्नीने दाखविला इंगा ; मैत्रिणीच्या वडिल,भावाच्या मदतीने पतीला दिला बेदम चोप

पुणे – लग्न झाले असताना दोन मुले असतानाही मैत्रिणीबरोबर राहणार्‍या पतीला पत्नीने चांगलाच इंगा दाखविला. पतीच्या मैत्रिणीचे वडिल, भाऊ यांना मदतीला घेऊन बेदम चोप दिला.

ही घटना येरवड्यातील सर्वधर्म सोसायटीमध्ये १ सप्टेबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याबाबत ३१ वर्षीय व्यक्तीने यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीचे वडिल, भाऊ आणि आत्याचा मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची मैत्रिण व त्यांचे दोन मुलांसह घरात होते. त्यावेळी फिर्यादी यांची पत्नी ही फिर्यादीच्या मैत्रिणीची आई, वडिल, भाऊ व आत्याचा मुलगा यांना घेऊन घरात आले. त्याच्याबरोबर का राहते, म्हणून मैत्रिणीबरोबर वाद विवाद करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मैत्रिणीच्या भावाने व आत्याच्या मुलाने फिर्यादीस दगडाने मारहाण केली. भावाने डोक्यात धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. मैत्रिणीसमक्ष त्यांनी सर्वांनी मिळून बेदम चोप दिला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार खैरे तपास करीत आहेत