
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दरवाढ, इतक्या रुपयांनी महागला गॅस, पहा तुमच्या येथील नवीन दर

दिल्ली – दसरा आणि दिवाळीच्या उत्साहात सगळेजण असताना खिशाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. महागाईच्या झटक्याने बाजारपेठा हादरल्या असून, व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी गॅसचे दर पुन्हा वाढले आहेत. महिन्याच्या पहिल्याच ही दरवाढ झाली आहे.

दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली आहे. दिल्लीमध्ये, १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १५९५.५० रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये १५८० रुपयांपर्यंत कमी झाली होती, म्हणजेच १५.५० रुपयांनी वाढली आहे. कोलकातामध्ये, सिलिंडरची किंमत आता १७०० रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये १६८४ रुपये होती, म्हणजेच १६ रुपयांनी वाढली आहे. मुंबईत त्याची किंमत सप्टेंबरमधील १५३१.५० रुपयांवरून वाढ होऊन आता १५४७ रुपये होईल. चेन्नईमध्ये, सिलिंडरची किंमत आता १७५४ रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये १७३८ रुपयांपर्यंत कमी झाली होती, म्हणजेच १६ रुपयांनी वाढली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या, परंतु ऑक्टोबरमध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे. याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या उद्योगांवर होणार आहे. दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण केंद्र सरकारने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएम उज्वला योजना 2.0 सुरू केली आहे. या अंतर्गत २५ लाख नव्या प्रधानमंत्री उज्ज्वला कनेक्शनची घोषणा केली आहे. याचा नक्कीच सर्वसामान्यांना मोठा फायदा मिळणार आहे.
महानगरांमधील घरगुती सिलेंडरचे दर
दिल्ली ₹८५३.००
मुंबई ₹८५२.५०
लखनऊ ₹८९०.५०
पुणे ₹८५६.००
पटना ₹९४२.५०
हैदराबाद ₹९०५.००
बेंगलुरु ₹८५५.५०









