
मुंबई – भारतीय क्रिकेट संघ सध्या कठीण काळातून जात आहे. त्याचबरोबर अनेक क्रिकेटपटूंचे संसारही धोक्यात आले आहेत. क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी तसेच कोरिओग्राफर धनश्री वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांमुळे प्रकाश झोतात आहेत. त्याला एक मिस्ट्री गर्ल कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. पण आता तिची प्रतिक्रिया समोर आली आहे.



धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्यातील नातं तुटलं असून ही जोडी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. सोशल मिडीयावरील पोस्ट देखील त्याला कारणीभूत होते. पण त्याचबरोबर मिस्ट्री गर्लमुळं दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा जोर धरू लागली होती. धनश्रीचे नाव प्रतीक उतेकरबरोबर जोडले जाऊ लागले. मात्र याबद्दल धनश्री अद्याप काहीही भाष्य केले नाही. याबरोबरच युजवेंद्र आरजे महवशला डेट करत असल्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. युजवेंद्रशी आरजेचं महवशचं नाव जोडलं गेलं त्याबद्दल आता आरजेने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने लिहिले की, “काही आर्टिकल व इंटरनेटवर अनेक चर्चा सुरु आहेत. पण या अफवा कीती हास्यास्पद आणि बिनबुडाच्या आहेत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर दिसलात म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला डेट करत आहात असं का? मला माफ करा. पण हे कोणतं वर्ष आहे? तुम्ही सगळे किती जणांना डेट करत आहात? मी दोन- तीन दिवस हे बघत आहे. पण मी कोणत्याही टीमला दुसऱ्याची प्रतिमा सांभाळावी म्हणून माझं नाव मध्ये आणू देणार नाही. कठीण काळात लोकांना, मित्रांना व कुटुंबाला शांततेत राहु दे”. क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल आरजे महवश ही सोशल मीडियाव चांगलीच सक्रीय आहे. तिच्या फॉलोअर्सचा आकडा हा १.४ मिलियनच्या घरात आहे. दरम्यान क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि डान्सर कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा सुरू होत्या. अशातच युझवेंद्रने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने ८ ऑगस्ट २०२० रोजी साखरपुड्याची घोषणा केली होती. चार महिन्यांनंतर म्हणजे २२ डिसेंबर २०२० रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली. पारंपरिक भारतीय रितीनुसार चहल आणि धनश्रीचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला होता. युजवेंद्र चहलचे धनश्रीबरोबर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात.










