आशिया कपसाठी भारताच्या क्रिकेट टीमची घोषणा

नवीन चेह-याला संधी, या खेळाडूंना दिला डच्चू, हा खेळाडू करणार नेतृत्व, असा असेल संघ

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा केली. ज्यात सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाची धुरा असेल तर शुभमन गिल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेतून आगामी आणि बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची घोषणा करण्याआधी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात अजित आगरकर आणि टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात बैठक पार पडली. आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे. ९ सप्टेंबरपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदा ही स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. यावेळी टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करेल. संजू सॅमसन टीममधील पहिल्या क्रमांकाचा विकेट किपर असून अतिरिक्त विकेट किपर महणून आयपीएल 2025 गाजवलेल्या जितेश शर्माची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाचा टेस्टमधील प्रमुख विकेट किपर ऋषभ पंत जखमी असल्यानं त्याचा विचार झालेला नाही. त्याचप्रमाणे इंग्लंड दौरा गाजवलेले ओपनर्स यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांची T20 टीममध्ये निवड झालेली नाही. तर सध्या फॉर्मात असलेला मुंबईकर श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा निराशा सहन करावी लागली आहे.

आशिया कप 2025 साठी भारतीय टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेट किपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह