कोंढवा,पुणे – सध्या महाराष्ट्रात विधान सभेची रणधुमाळी सुरू आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे, कोंढवा बुद्रुक गावातील ग्रामदैवताचा आशीर्वाद व नागरिकांचा पाठिंबा घेत, अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली आहे. गंगाधर बधे यांनी माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हे निवडणूक लढवत आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असताना,ही निवडणूक अचानक एका नव्या वळणावर पोहोचली आहे. कालपर्यंत केवळ अंदाज लावणाऱ्या लोकांच्या चर्चेत आता गंगाधर बधे यांचे नाव आघाडीवर आहे. गंगाधर बधे विजयी होणार असा निर्धार सर्वसामान्य मतदारांच्या तोंडात चर्चा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हडपसर मतदार संघात परिवर्तन घडल्यास मतदारसंघ व लोकांचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागत नाही. अपक्ष उमेदवार गंगाधर बधे एक निस्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे.गंगाधर बधे विजयी होणार असा विश्वास माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिक, मतदार माझ्या सोबत आहेत असा विश्वास अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी व्यक्त केला. हडपसर मतदारसंघात विरोधकांसाठी निवडणूक सोपी राहिलेली नाही बधे यांच्या सहभागामुळे निवडणूक अटीतटीची होईल अशी चर्चा हडपसर विधानसभेत आहे