इंदापूर हादरले ! दुचाकीवरुन आलेल्या एकाने भर चौकात तरुणावर केला गोळीबार, हल्ल्यामागील नेमकं कारण काय ?

इंदापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले. दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरुणावर गोळीबार केला. भर चौकात हा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.

इंदापूर शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला असताना इंदापूर महाविद्यालयासमोर ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली.राहुल अशोक चव्हाण (वय २५)असे या गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे.

हल्लेखोराने एकूण चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या राहुल याच्या पाठीला लागल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.राहुल हा शिरसोडी येथील रहणारा आहे. पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणारी अ‍ॅकेडमी राहुल याचा भाऊ चालवतो. या हल्ल्यामागील कारण अद्याप समोर आले नाही. इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.