
गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज शनिवार २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

आज आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे.त्यानुसार आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली आहे. तर ८०१ मतांनी पहिल्या फेरीत टिंगरे यांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे पिछाडीवर आहेत.

वडगाव शेरी पहिली फेरी– बापू पठारे – ५५५९ ,सुनील टिंगरे –६३२७
वडगाव शेरी दुसरी फेरी मते – बापू पठारे – १०८२२ ,सुनील टिंगरे – १३२१४
वडगाव शेरीमध्ये दुसऱ्या फेरीअंती सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. सुनील टिंगरे यांना १३२१४ मते तर बापू पठारे यांना १०८२२ मते आहेत.
वडगाव शेरीमधून चौथ्या फेरीअखेर सुनील टिंगरे ८ हजार ३९२ मतांनी आघाडीवर आहेत
वडगाव शेरीमधून सहाव्या फेरीअखेर सुनील टिंगरे ११ हजार ५९३ मतांनी आघाडीवर
वडगाव शेरीमधून सातव्या फेरीअखेर सुनील टिंगरे १५ हजार ६४७ मतांनी आघाडीवर









