पहिल्याच प्रयत्नात ही तरुणी झाली आयएफएस अधिकारी

कोलकत्ता – युपीएससीची परिक्षा ही सर्वात कठीण परीक्षा असते. अनेकांना त्यात यश मिळवता येत नाही. पण काहीजण ती पहिल्याच प्रयत्नात पास करतात आणि आयएएस होतात. एका २३ वर्षीय तरूणीने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास करत यश मिळवले आहे.

पश्चिम बंगालमधील तमाली साहा हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी UPSC ची प्रतिष्ठित भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि IFS अधिकारी बनली आहे. २०२० मध्ये तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC ची भारतीय वन सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. तिच्या चमकदार कामगिरीमुळे तिची आयएफएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तमालीचा कल सुरुवातीपासूनच नागरी सेवेत रुजू होण्याकडे होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तमाली कोलकाता येथे राहायला गेली, जिथे तिने कोलकाता विद्यापीठातून पदवी घेतली. तिने महाविद्यालयीन जीवनात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे तमालीने तिच्या अभ्यासादरम्यान यूपीएससीची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात तिला यश देखील मिळाले. योग्य नियोजन, शिस्त आणि ध्येयाप्रती प्रामाणिक राहणं ही कोणत्याही अडचणींवर मात करण्याची गुरुकिल्ली आहे, असे तमालीने सांगितले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी सुमारे १० लाख उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. पण खूप कमी मुलांना यश मिळतं आणि त्यांची IAS, IPS आणि IFS सारख्या प्रतिष्ठित पदांवर नियुक्ती होते.