
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर, चांदीचे दरही घसरले, कारण काय, आगामी काळात दर चढणार की उतरणार?

मुंबई – सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला आता ब्रेक लागला आहे. तसेच सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. या घसरणीमुळे सोन्याचे दर कमी झाले असून नागरिक पुन्हा सोने खरेदीकडे वळाले आहेत.

आजही सर्वसामान्य नागरीक सोन्याकडे गुंतवणुक म्हणून पाहतात. पण मागील काही दिवसापासून सोन्याचे दर वाढत होते, पण आता अचानक सोन्याचे दर घसरले आहेत. आता २४ कॅरेट सोन्याच्या दरात २२० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८६,८४० रुपयांवरुन ८६,६२० रुपये इतका झाला आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात २०० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर ७९,६०० रुपयांवरुन ७९४०० रुपये प्रति २० ग्रॅम इतका झाला आहे. १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याच्या दरात १६० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर ६५,१३० रुपयांवरुन ६४९७० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. दुसरीकडे चांदीचा दर मागील बंद ९५,७६९ रुपये प्रति किलोवरून कमी होऊन ९५,०४८ रुपये प्रति किलोवर आला आहे. आज शुक्रवारी सोने ८४,९०० रुपयांच्या जवळपास, तर चांदी ९३,२०० रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. ऑक्टोबरपासून सोने आणि चांदीच्या दरात इतर वित्तीय साधनाच्या तुलनेत जास्त वाढ झाली आहे. तर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले आहेत. दरम्यान सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर ते आपल्या परंपरा आणि सणांचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः लग्न आणि सणांमध्ये त्याची मागणी वाढते.
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करत असते. सध्या डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव आहे.









