दहावीच्या पेपरवेळी धक्कादायक प्रकार,विद्यार्थ्याची बॅग चेक केली, अन् सगळे हादरले

नाशिकच्या सातपूर परिसरातील एका शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील सातपूर हा परिसर कामगारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. सातपूर औद्योगिक वसाहत याच ठिकाणी असल्यामुळे या परिसरात हिंदी भाषिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत. सातपूर येथील एका हिंदी भाषिक विद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हिंदी भाषिक शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये चक्क एक कोयता आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या कोयता गँग राज्यात अनेक ठिकाणी दहशद पसरवत आहेत.

दरम्यान, सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बॅग घेऊन जाण्याची परवानगी नाही. सर्वांनी रूमच्याबाहेर आपल्या बॅगा ठेवल्या होत्या. एका विद्यार्थ्याने बाहेर ठेवलेली बॅग तेथे सुरक्षेला असलेल्या होमगार्डला संशयास्पद वाटली. यामुळे त्याने ती उघडून बघितली. यामुळे होमगार्डला आश्चर्याचा धक्का बसला. त्या बॅगेत होमगार्डला कोयता आढळून आला. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोयत्याची काय गरज, कोयता नेमका कुठून आला? यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या घटनेची माहिती होमगार्डने स्थानिक सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिली. परीक्षा संपल्यानंतर पोलीस विद्यालयात दाखल झाले आणि बॅकसह विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. यामुळे लहान वयातच अशा प्रकारे घटना धक्कादायक आहेत. दरम्यान, राज्यभर कोयत्याने हल्ला, कोयत्याचा धाक दाखवत लुटमार, कोयता गँगची दहशत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. यामुळे मात्र भीती व्यक्त केली जात आहेत.