लाडकी बहिण योजनेचा लाभ घेताय मग ही बातमी वाचाच!

अजित पवार यांनी विधानसभेत केली घोषणा, लाडकी बहिण योजना राबवणार मोदींच्या या योजनेची संकल्पना

मुंबई – राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना आता केवळ गरीब महिलांसाठीच असणार आहे. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली. तसेच या योजनेत बदल देखील केले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये देणाऱ्या लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार आहे. याअंतर्गत, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे किंवा ज्या चांगले कमाई करत आहेत अशा लाखो महिलांना यादीतून वगळता येईल. अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले की, ही योजना रद्द केली जाणार नाही, परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत निश्चितच बदल केले जातील. अजित पवार यांनी अपात्र लोकांनाही दिलासा दिला आहे. अपात्र असूनही ज्यांना योजनेचा लाभ मिळाला त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, योजनेतून कोणालाही वगळण्यापूर्वी, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांना आम्ही याचा लाभ घेऊ नये असे आवाहन करू. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केल्यासारखेच असेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी ठेवला होता. परंतु २०२५-२६ मध्ये यासाठी फक्त ३६ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान नव्या निकषांनुसार ५० लाखांपेक्षा जास्त लाडक्या अपात्र होण्याची भीती वर्तवली जात आहे.

राज्य सरकारचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर झाला. अजित पवार यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प जवळपास ४५ हजार लाख रुपयांचा तुटीचा होता. त्यामुळे राज्य सरकारवर पैसे खर्च करण्यास प्रचंड मर्यादा आल्या आहेत.