अमेरिकेत जाण्याचा विचार करताय मग ही बातमी वाचाच!

अमेरिकेत प्रवेस करण्यास या देशातील नागरिकांना बंदी, व्हिसावरही टाकले निर्बंध, भारतीयांबाबत काय निर्णय?

दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल ट्रम्प आपल्या अजब निर्णयामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी अजब निर्णय घेतला आहे. त्याचे जागतिक पातळीवर मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रम्प यांनी म्यानमार, अफगाणिस्तान, हैती, इराण, लिबिया, सोमलिया, गिनी, कॉंगो, येमेन, चाड, सुदान आणि इरिट्रियाच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबा, लाओस, टोगो, व्हेनेझुएला, बुरुंडी, सिएरा लिओन अशा ७ देशांवर आंशिक बंदी घातली आहे. या देशांमधून येणाऱ्या लोकांवर विशेष अटी आणि कडक चौकशी केली जाणार आहे. हे निर्बंध ९ जूनपासून लागू होणार आहे. या निर्णयावर माहिती देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या नागरिकांच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी मला हे कठोर पाऊल उचलावे लागले आहे. कट्टरपंथी दहशतवाद्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही पुन्हा प्रवास बंदी करत आहोत. असे ते म्हणाले आहेत. दरम्यान कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांना देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही पुन्हा प्रवास बंदी लागू करू. यास सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवले आहे, असे ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ मध्ये प्रवास बंदी घातली होती. यामध्ये बहुतेक मुस्लिम बहुल देशांचा समावेश होता. तसेच ट्रम्प यांनी इतर देशांच्या नागरिकांना व्हिसा देताना काळजी घेण्यास सांगितले आहे. आता बंदी करण्यात आलेले देश काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.