
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहेत. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मीकी कराड यांचे नाव आल्याने मुंडे अडचणीत आले आहेत. त्यातच आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाना साधला होता. अखेर धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर येत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. पण त्यामुळे खळबळ उडाली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे म्हणाले, विरोधकांनी काही म्हंटले तर माझ्याकडून काही तरी जाणार, मग त्यात नक्कीच मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यात अडचण होणार. त्यामुळे एकदा काय ते दूध का दूध पाणी का पाणी कळावे आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून कळले आहे. मी सुरुवातीपासून सांगत आहे की ही व्यवहारातून झालेले भांडण आहे ज्यातून अतिशय निर्घुणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. अशा प्रकारे हत्या झाली आहे की त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. त्यामुळे जवळजवळ सर्वच आरोपींना अटक झाली आहे. आणि जेवढी तीव्र भावना या प्रकरणात आमच्या सर्वांचीच होती आता जे अटक झाली आहेत त्यात एसआयटी नेमली आहे, सीआयडी नेमली आहे, त्यामुळे याचा शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. विरोधकांनी काय बोलावे हे मला सांगता येत नाही. पण त्यांनी हे जरी सांगितले की मी कराड अण्णा कुठे आहे तर पोलिसांनाही समजले असते आणि त्यांनाही अटक केली असती. असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असले तरी त्याचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत.









