मला असा माणूस हवा जो मला प्रेग्नंट करू शकेल… 25 लाख रुपये देईन,बघा काय घडल

पुणे : सायबर फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार पुण्यात समोर आला आहे. सोशल मीडियावर “प्रेग्नंट जॉब” नावाच्या जाहिरातीच्या माध्यमातून शहरातील एका कंत्राटदाराला तब्बल ११ लाख रुपयांचा फसवणुकीचा फटका बसला आहे. या जाहिरातीत “एका महिलेला गर्भवती केल्यास २५ लाख रुपये दिले जातील” असा दावा करण्यात आला होता. या आमिषाला बळी पडून कंत्राटदाराने रक्कम भरल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. सध्या बाणेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तपास सुरू आहे.

बाणेर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंत्राटदाराच्या मोबाईलवर “प्रेग्नंट जॉब” या शीर्षकाचा व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये एक महिला म्हणताना दिसत होती “मी अशी व्यक्ती शोधत आहे जी मला आई बनवेल. त्याचा रंग, शिक्षण, जात मला महत्त्वाचं नाही.” व्हिडिओतील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर कंत्राटदाराशी एका व्यक्तीने बोलून स्वतःला ‘प्रेग्नंट जॉब फर्म’चा सहाय्यक असल्याचं सांगितलं. त्याने कंत्राटदाराला सांगितलं की, “महिलेसोबत राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ओळखपत्र तयार करावं लागेल.

त्यानंतर काही दिवस कंत्राटदाराला रजिस्ट्रेशन फी, आयडी कार्ड, व्हेरिफिकेशन, जीएसटी अशा विविध कारणांखाली पैसे मागण्यात आले. तपासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते २३ ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदाराकडून वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये एकूण ११ लाख रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले. या काळात ठगांनी त्याला कधी खोट्या आश्वासनांनी, तर कधी धमक्यांनी गप्प ठेवले. शेवटी जेव्हा कंत्राटदाराने त्यांच्या मागण्यांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी त्याला ब्लॉक केलं. तेव्हाच त्याला फसवणुक झाल्याचं समजलं आणि त्याने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.