मी मिनी पाकिस्तानातून सलग चार वेळा निवडून आलोय

मिरज- हिंदू गर्जना सभेत भाजपाचे आमदार सुरेख खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाषणादरम्यान खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला. त्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे हिंदुत्त्वावादी नेते नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खाडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. निसटता पराभव आपल्या पदरी पडला, काही मते कमी पडली. पण, विधानसभा निवडणुकांवेळी बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर सगळा हिंदू एकत्र झाला आणि विधानसभेचा निकाल भरभराटीने दिसून आला. आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे, त्यामुळे आम्ही मागे नाही. आम्हीपण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो. मी मिनी पाकिस्तानमधून चारवेळा चौकार मारत आमदार झालो आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मिरज मतदारसंघ हा मुस्लीम बहुल मतदारसंघ असून येथे मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय आपला देश हिंदू राष्ट्र झाले पाहिजे. त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने पावलं टाकली पाहीजेत. असं म्हणत यांनी पुन्हा एकदा आपल्या मतदार संघाचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला. सुरेश खाडे हे माजी मंत्री आहेत. त्यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे. त्यामुळेच तिथून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे निवडून येतात, असे वादग्रस्त विधान भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले होते. तो वाद शमतो ना तोच खाडे यांच्या वक्तव्याने आरोप प्रत्यारोपाची राळ उडण्याची शक्यता आहे.