आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे मला वाईट अनुभव आला

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली ती वाईट आठवण, नातेवाईक, शिक्षकांनी दिला होता त्रास, रिलेशनबाबत म्हणाली….

मुंबई – टीव्ही अभिनेत्री रोशनी वालिया लवकरच अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा हा पहिला चित्रपट आहे. पण यावेळी रोशनीने आपल्या खाजगी आयुष्यातील काही प्रसंग सांगताना भावूक झाली होती.

अजय देवगनचा चित्रपट ‘सन ऑफ सरदार २’ चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये संजय दत्तच्या जागी रवि किशन दिसत आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. चित्रपटात धुळ्याची अभिनेत्री मृणाल ठाकूर प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटातून रोशनी वालिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रोशनीने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. रोशमी हिच्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी दुसरा संसार थाटला. पण आईने मात्र सिंगल मदर म्हणून आयुष्य व्यतीत केलं. आता रोशनी आई आणि बहिणीसोबत मुंबईत राहते. आम्ही जेंव्हा मुंबईत आलो त्यावेळी नातेवाईकांना आम्हाला खुप त्रास दिला असेही अभिनेत्री म्हणाली. “आमचे कोणतेही नातेवाईक नाहीत, परंतु माझे आणि माझ्या आईचे काही मित्र-मैत्रिणी आता आमचं कुटुंब बनले आहे. नातेवाईकांना माझ्या आईला शाप दिला की, ती कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. पण आईने त्यावेळी मोठा निर्णय घेतला होता आणि आज आम्ही खूप आनंदी आहेत” असं रोशनीने म्हटले आहे. तसेच आज आपण आपल्या आईमुळे यशस्वी आहोत, असे आवर्जून सांगितले. रोशनी तिच्या नातेसंबंधांविषयी म्हणाली, “डेटिंग करणं माझ्यासाठी कधी कठीण नव्हतं. कारण सगळ्यांनाच मी आवडायची. १६ ते १७ वर्षांमध्येच माझा पहिला बॉयफ्रेंड होता. पण ते लहान मुलांसारखं प्रेम होतं. पण प्रेमात कधी मी निराश झाले नाही. प्रेम बरोबर नाही तर मी पागल होणार असं कधी मी केलं नाही. शाळेतही मुलंच माझे मित्र होते. मुली मैत्रिणी खूप कमी होत्या. त्यामुळे शिक्षकांना माझी मुलांबरोबरची मैत्री आवडायची नाही, असेही तिने सांगितले.

https://www.instagram.com/reel/DMfsuumt_NP/?igsh=aGtsbjUxZWo4bzFr

रोशनी वालियाचा जन्म २० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. रोशनीने तारा फ्रॉम सातारा, भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप आणि महादेव यासाठी ओळखली जाते. त्याचबरोबर रोशनीने ‘बालिका वधू’, ‘ये वादा रहा’, ‘गुमराह’, ‘आय एम बन्नी’, ‘मै लक्ष्मी तेरे आंगन की’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.