तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून पतीने त्याचे चित्रीकरण केले. याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुनावळे येथे घडली.
याबाबत ३० वर्षीय पत्नीने बुधवारी (दि. १६) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह चार जणांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत पुनावळे येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. तसेच या अत्याचाराचे अश्लिल चित्रफित तयार केली. ती चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्यही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पत्नीने यास विरोध केला असता तिला शिवीगाळ केली. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.