
दरवाढीच्या वादळानंतर सोने-चांदीची किंमत काय? चांदीही चकाकली, जाणून घ्या आजचा ताजा भाव

मुंबई – सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना दिसून येत आहे. आज २४ कॅरेट सोने विना जीएसटी ९९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर एक लाखाच्यावर आहे. तर चांदीचा भाव देखील वधारला आहे.

सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा बदल झाले आहेत. सलग अनेक दिवस घसऱणीनंतर सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९९१४७ रुपये झाला, तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९१,३२८ रुपये आहे. मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,१६३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९९,४५० प्रति १० ग्रॅम आहे. पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,१६३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,४५० रुपये आहे. नागपूर २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,४५० रुपये इतका आहे. नाशिक २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,४५० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ११४,२६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,१४३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण असते.
सोने आणि चांदीचे भाव अनेक जागतिक आणि स्थानिक घटकांच्या आधारे दररोज ठरवले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात या धातूंचे भाव अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित केल्या जातात, त्यामुळे डॉलर-रुपया विनिमय दराचा त्यांच्यावर थेट परिणाम होतो.









