मुंबई – नारायण मूर्तींच्या आठडड्यात ७० तास काम या विधानावर वादविवाद सुरू असतानाच सुब्रह्मण्यन यांच्या विधानाने त्याला फोडणी दिली आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच अनेकजण टिकाही करत आहेत.
एल अँड टीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी एका आठवड्यात ९० तास काम करायचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सिनेविश्वापासून ते उद्योग जगतातील दिग्गजांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. L&T चे चेअरमन यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आठवड्यातून ९० तास काम करण्याची सूचना केली. इतकंच नाही सुब्रमण्यन यांनी तर ‘तुम्ही किती दिवस घरी बसून तुमच्या पत्नीकडे बघणार? असा उलट सवाल विचारला आहे. Reddit वर प्रसारित झालेल्या एका व्हायरल व्हिडिओत असं पाहायला मिळतं की एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात केवळ ९० तास करम्याचा सल्ला दिलेला नाही तर कर्मचाऱ्यांना म्हटलं की ‘तुम्ही घरी थांबून पत्नीला किती वेळ पाहणार, घरी कमी कार्यालयात अधिक वेळ घालवा’, यानंतर सोशल मीडियावरुन एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्यावर टीका सुरु झाली आहे. आमच्या चेअरमनची टिप्पणी या महान महत्वाकांक्षेला प्रतिबिंबित करतात. जे असाधारण परिणामांसाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता आहे. ८ दशकांहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, व्यवसाय आणि तांत्रिक क्षमतांना आकार देण्याचे काम करत आहोत. हे भारताचे दशक आहे. अशी प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे. दरम्यान दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबतीत एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये तिने फये डिसूझा यांच्या या वक्तव्यासंबंधीच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपीकाने आपल्या स्टोरीत मेंटल हेल्थ मॅटर असा हॅशटॅग वापरून म्हटले आहे की, ‘एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे पाहून धक्का बसला. असे दिपीका म्हणाली आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात एस. एन. सुब्रह्मण्यन यांना एकूण पगार, बोनस, आणि अन्य फायदे मिळून करोडो रुपयांचे मानधन मिळालं आहे. सुब्रमण्यम यांचा एकूण पगार ५१ कोटी इतका असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यांना ४३.११ टक्के पगारवाढ मिळाली आहे.