
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड आणि यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

पुणे – महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पुणे शहर आणि कोकणात पावसाचा जोर लक्षणीय वाढला असून, अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार आहे.

पुणे शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागांत बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. या पावसाचा जोर गुरुवारी असणार आहे. पण मागील काही दिवसापासून पाऊस शांत होता. हवामान विभागाने ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु बुधवारी रात्री चांगला पाऊस झाला. रात्री पुणे शहरांसह घटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भात गुरुवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यातील शेतकरी वर्गाला या पावसाची प्रतीक्षा असल्याने, ६ जुल्यानंतर पावसाचा जोर वाढणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे. त्याचबरोबर हवामान विभागाकडून पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक घाटसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर 4 जुलैसाठी, पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. रत्नागिरी, रायगड, पुणेसह सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदियाला ५ जुलैला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यंदाचा जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. मात्र, ईशान्य व पूर्व भारतातील बहुतांश भाग, तसेच दक्षिणेकडील काही टोकाचे परिसर आणि वायव्य भारतातील काही भागांत पर्जन्यवृष्टी सरासरीपेक्षा कमी राहण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.









