सोन्याची किंमत वाढली की कमी झाली? आजचा भाव काय?

भारतात दरवाढीमुळे सोन्याच्या आयात घटली, विक्रमी दरवाढीमुळे मागणीत घट, पहा आजचा भाव

मुंबई – सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याची झळाळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली तर चांदीची खरेदी नोकरदारांना परवडेना झाली आहे.

अलीकडेच दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत तेजी-मंदीचा खेळ दिसत आहे. सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचे दर मंदावले. टॅरिफशी संबंधित चिंता कमी झाल्या असून यूएस फेडने दर कपातीची आशा कमी झाली आणि कमी स्पॉट मार्केट मागणीमुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १८ जुलै २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,८६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८९,७०५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ११२,८५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,१२९ रुपये आहे. आज मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९१,०६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९९,३४० रुपये आहे. पटना आणि अहमदाबादमध्ये २२ कॅरेटचे १० ग्रॅम सोने ९१,११० रुपयांना आणि २४ कॅरेटचे तेवढेच ग्रॅम सोने ९९,३९० रुपयांना उपलब्ध आहे. जयपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,१४० रुपये आहे, तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९९,४९० रुपये आहे. दरम्यान गेल्या दहा वर्षांत भारताने जूनमध्ये सरासरी 52.4 टन सोने आयात केले होते. पण यावर्षीच्या जूनमध्ये त्यात मोठी घट झाली आहे.

जूनमध्ये भारताची सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी घसरून दोन वर्षांहून अधिक काळातील सर्वात कमी पातळीवर पोहोचली आहे. किमतींमध्ये झालेल्या विक्रमी वाढीमुळे मागणीत घट झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टीप – उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात याची नोंद घ्यावी