
ट्रम्पच्या घोषणेने एका झटक्यात सोन्याचा दरात चढ उतार, १० ग्रॅममागे किती पैसे द्यावे लागतील?

मुंबई – सोने आणि चांदीच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहेत. सोने सलग चौथ्या दिवशी घसरले आहे तर चांदीही उतरली आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याची किंमत खरेदीसाठी चांगली संधी ठरू शकते.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, बुधवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव कमी झाला असून ९९६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर इतका आहे, तर चांदीचा भाव ११३५९३ रुपये प्रति किलो इतका आहे. त्याचबरोबर सोने २३ कॅरेट ९९२७० रुपये, सोने २२ कॅरेट ९१२९८ रुपये, सोने १८ कॅरेट ७४७५३ रुपये, सोने १४ कॅरेट ५८३०७ रुपये तर चांदी ११३३१३ रुपये प्रति किलो आहे. सोने आणि चांदीची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. सर्वात मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोने आणि चांदीच्या किमतींवर होतो. याशिवाय, देशाच्या चलनाची ताकद किंवा कमकुवतपणा, म्हणजेच रुपयाचे मूल्य, देखील दरावर परिणाम करते. स्थानिक मागणी आणि पुरवठा, जसे की सण किंवा लग्नाच्या हंगामात जास्त खरेदी, देखील किंमती वाढवू किंवा कमी करू शकतात. याशिवाय, सरकारी धोरणे आणि कर नियम देखील सोने आणि चांदीची किंमत निश्चित करण्यात भूमिका बजावतात.
टॅरिफ रेट आणि जागतिक घडामोडी याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. सोमवारपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. टॅरिफमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे.









