
पैसे कट होऊनही व्यवहार अपूर्ण, UPI सेवा का ढेपाळली?, सेवा खंडित झाल्याने लोक त्रस्त!

मुंबई -अलिकडे सर्वजण आपले व्यवहार डिजिटल पद्धतीने केत आहेत. यातील बहुसंख्य लोक गुगल पे वापरत आहेत. पण देशभरात युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद झाली आहे. अनेक ग्राहकांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहक देखील त्रस्त झाले आहेत.

युपीआय सेवा ढेपाळल्याचे बुधवारी दिसून आले. त्यामुळे Google Pay, Phone Pay, Paytm वरून व्यवहार करताना अनेकांना अडचणीचा सामना करावा लागला. त्यांना पैशांचा व्यवहारच करता आला नाही. अनेक जण सध्या ऑनलाईन पेमेंटवर भरोसा करतात. त्यामुळे ते रोख पैसे जवळ ठेवत नाही. पण युपीआय सेवा अचानक ठप्प झाल्याने त्याचा फटका अनेकांना बसला. शिवाय काय कारण आहे हे समजत नसल्याने अनेकांना मनस्ताप ही झाला. ऑनलाईन सेवा डाऊन झाल्यामुळे त्यासंदर्भातील माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्म डाऊनडिटेक्टर नुसार प्रचंड तक्रारी नोंदविल्या जात आहेत. ज्यामध्ये पेमेंट, वेबसाईट अॅक्सेस आणि अॅप संदर्भातील तक्रारी होत्या. गुगल पेसह तर पेमेंट अॅपला देखील समस्या येत असल्यानं यूजर्स त्रस्त झाले झाले आहेत. यापूर्वी २६ मार्चला देखील अशीच समस्या निर्माण झाली होती. काही जणांचे या काळात व्यवहार करताना दोन वेळा पैसे कट झाल्याचे ही समोर आले आहे. तसा दावा युजर्स करत आहेत. मात्र ज्यांचे पैसे कट झाले आहेत ते 24 तासाच्या आत त्यांच्या खात्यात जमा होतात. ट्रँकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या आकड्यावरून संध्याकाळी सहा वाजता यूपीआई व्यवहार करताना जवळपास तीन हजार पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत.
वापरकर्त्यांकडून प्रचंड तक्रारी वाढल्या आहेत. नेमकी ही सेवा कशामुळे डाऊन झाली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यूपीआय सेवा वापरणाऱ्या आणि त्यामाध्यमातून फक्त ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.









