
स्कायमेटकडून मान्सूनचा अंदाज जाहीर, लवकर होणार आगमन, यंदा ‘इतका’ टक्के पाऊस बरसणार

मुंबई – राज्यात सध्या उन्हाचा कडका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पार ४० डिग्रीच्या पुढे गेला आहे. त्यातच आता मान्सुनच्या आगमणाची आनंद देणारी बातमी समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रात जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटने २०२५ मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाजही वर्तवला असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून असेल. तसेच आत्तापासून मान्सूनची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते असून, सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात केरळ, कर्नाटक, कोकण आणि गोव्यामध्ये सामान्यहून अधिक आणि मध्य भारतात सामान्य पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात मान्सून अपेक्षित वेळेहून दिरंगाईनं हजेरी लावेल तर, जुलै महिन्यात पश्चिम घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस होणार आहे. यंदा जून महिन्यास सरासरीहून कमी म्हणजेच ६९ टक्के पाऊस असेल. तर, जुलै महिन्यात हे प्रमाण १०२ टक्के इतकं असेल. ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण १०८ टक्के आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १०४ टक्के पर्जन्यमान राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात ५ टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८६८.६ एमएम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रत पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज आहे.
एल निनो शिवाय इतर घटक देखील मान्सूनवर परिणाम करत असतात. आयओडी सध्या प्रभावहीन असून यामुळे मान्सूनच्या सुरुवातीसाठी सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस अपेक्षित आहे.









