
इतिहासात पहिल्यांदाच सर्व वीजबिलात होणार कपात? कपातीचे कारण काय? या वर्षीपासून होणार थेट लाभ

मुंबई – वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात होणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.

राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदरात कपातीचा प्रस्ताव महावितरणकडून सादर करण्यात आला होता. पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत, ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱया घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तर शेतकऱयांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी अंमलात येणाऱया मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेत विपेंद्रित स्वरूपात सौर ऊर्जेद्वारे वीज तयार करून त्यावर पंप चालवण्यात येणार आहेत. या योजनेची क्षमता १६ हजार मेगावॅट इतकी असेल आणि त्या माध्यमातून सरासरी ३ रुपये प्रति युनिट इतक्या कमी दराने वीज उपलब्ध होणार आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत ही योजना पूर्ण होणे अपेक्षित आहे. महावितरणने भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन रिसोर्स अॅडेक्वसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार २०३० पर्यंत राज्याची विजेची क्षमता ८१ हजार मेगावॅट होण्यासाठी ४५ हजार मेगावॅटचे वीजखरेदी करार केले आहेत. त्यापैकी ३१ हजार मेगावॅट वीज रिन्युएबल ऊर्जास्रोsतांमधून मिळणार आहे. ही वीज अत्यंत किफायतशीर दरात मिळणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत. आगामी पाच वर्षात महावितरणचे वीजखरेदीचे ६६ हजार कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडता आला आणि आयोगानेही त्यानुसार आदेश दिला आहे.
राज्याच्या इतिहासात प्रथमच
पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.









