सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दरात झाली घसरण

Oplus_131072

मागील १० दिवसात भाव ‘इतक्या’ रुपयांनी घसरले, १ तोळा सोन्याचा भाव काय?, का घसरले सोने?

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. केवळ सोनेच नाही तर चांदीच्या दरातही घसरण होत आहे. यंदाच्या वर्षी सोन्याच्या दराने नवनवा उच्चांक गाठला त्यामुळे दागिने खरेदीसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागले होते. पण आता दर घसरत आहेत.

आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर १,००,७५० रुपयांवरुन १,००,१५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात ५५० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर ९२,३५० रुपयांवरुन ९१,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याच्या दरात ४५० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर ७५,५६० रुपयांवरुन ७५,११० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात झालेल्या शांतता चर्चेमुळे सोन्याच्या दरात नरमाई आली आहे. मागच्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत जवळपास २५०० रुपये प्रति १० ग्रॅमने घसरण झाली आहे. रक्षाबंधनापूर्वी शुद्ध सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव १ लाख ४ हजारावर पोहोचला होता. पण आता त्यात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झालेली असताना चांदीच्या दरात सुद्धा घसरण झालेली आहे. यामुळे चांदीचा दर १,१५,००० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव कमी होत असल्यानं गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भांडवली बाजारात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत आहे.