
किंमत किती कमी झाली?, ‘हे’ आहेत नवीन दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. पण ही दरकपात व्यावसायिक सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे.

आज २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. याआधी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. या एलपीजी सिलेंडरची किंमत ७ रुपयांनी कमी झाली आहे. तसेच, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ ऑगस्ट २०२४ पासून एलपीजी सिलेंडरची किंमत कायम आहे. १ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत १७९७ रुपये झाली आहे. पूर्वी ते १८०४ रुपयांना उपलब्ध होते. कोलकातामध्ये या एलपीजी सिलिंडरची किंमत १९११ रुपयांवरून १९०७ रुपयांवर आली आहे. आता मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १७४९.५० रुपयांना उपलब्ध आहे. पूर्वी ते १७५६ रुपयांना उपलब्ध होते. त्याच वेळी, हे एलपीजी सिलिंडर आजपासून चेन्नईमध्ये १९५९.५० रुपयांना उपलब्ध आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग ११ महिन्यांपासून कोणताही बदल झालेला नाही. मार्च २०२४ मध्ये, सरकारने १०० रुपयांची कपात केली होती. यानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे, तर कोलकातामध्ये ८२९ रुपयांना, मुंबईत ८०२.५० रुपयांना आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळत आहे.
अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण आज सलग आठव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आजच्या अर्थसंकल्पात सामान्य माणसाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.









