
सोने घेण्याचा विचार करताय मग ही बातमी वाचाच! दरवाढीमागील कारणे काय?

पुणे – धुलीवंदनानिमित्त सोने घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ कायम असल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या या दरवाढीमुळे सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठला आहे.

शुक्रवारी (१४ मार्च) सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात १२०० रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढला आहे. यामुळे हा दर ८८,५८० रुपयांवरुन ८९,७८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात ११०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर ८१,२०० रुपयांवरुन ८२,३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याच्या दरात ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर ६६,४४० रुपयांवरुन ६७,३४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.
२४ कॅरेट सोने दर (१० ग्रॅम)
मुंबई 89,780 रु.
पुणे 89,780 रु.
नागपूर 89,780 रु.
कोल्हापूर 89,780 रु.
जळगाव 89,780 रु.
सांगली 89,780 रु.
बारामती 89,780 रु.
२२ कॅरेट सोने दर (१० ग्रॅम)
मुंबई 82,300 रु.
पुणे 82,300 रु.
नागपूर 82,300 रु.
कोल्हापूर 82,300 रु.
जळगाव 82,300 रु.
सांगली 82,300 रु.
बारामती 82,300 रु.









