सोन्याची उसळी! दसऱ्याच्या आधी सोन्याचे भाव गगनाला भिडले

सोने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर, चांदीची सोन्याच्या वरचढ, जाणून घ्या आजचे विक्रमी दर

मुंबई – सणासुदीचा सीजन आणि जागतिक अनिश्चिततेदरम्यान, सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत १,४०० रुपयांची वाढ झाली. जागतिक मंदीच्या काळात सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये तब्बल पंधराशे रुपयांची..तर चांदीच्या दरात सुद्धा पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे. काल सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली होती. काल सोने आणि चांदीत प्रत्येकी १ हजार रुपयांची वाढ झाली असून दराने नवा इतिहास रचला होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोने आणि चांदी घसरले. २४ कॅरेट सोने १,१६,९०० रुपये, २३ कॅरेट १,१६,४४०, तर २२ कॅरेट सोने १,०७,०८ रुपयांवर आहे. १८ कॅरेट आता ८७,६८० रुपये, १४ कॅरेट सोने ६८,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव १,४४,३८७ रुपये इतका झाला आहे. दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि पुणे येथे २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम रु.११८,४६० आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम रु.१०८,६०० या दराने विकले जात आहे. कोलकाता, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोने ₹११८,३१० आणि २२ कॅरेट सोने ₹१०८,४५० (प्रति १० ग्रॅम) ला उपलब्ध आहे. दरम्यान, २४ कॅरेट सोने गुंतवणूकीसाठी खरेदी केले जाते, तर २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. सोन्याने सातत्याने चांगला परतावा दिला आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. म्हणूनच गुंतवणूकदार सोन्याकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. दरम्यान दसऱ्याला सोन्याचे भाव वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.

दसरा आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला अनेक जणांची पसंती सोने खरेदीला असली तरी सोन्याचा १० ग्रॅमच्या भावाने पुन्हा उसळी मारली आहे. सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

(टीप – बातमीमधील दर आणि प्रत्यक्ष दुकानातील दर यात जीएसटी आणि इतर करामुळे बदल असू शकतो)