
सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ, आठ महिन्यात सोन्याच्या दरात इतक्या हजारांची वाढ, चांदी खातेय भाव

मुंबई – सोन्या आणि चांदीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले आहेत. अवघ्या आठवडाभरात सोने ३ हजार रुपयांनी तर चांदी साडेतीन हजार रुपयांनी महागली आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख २ हजार ३८८ रुपये झाली आहे. रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ३१ ऑगस्ट २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १०४,०९० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९५,४१६ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १२१,४५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,२१५ रुपये आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९५,२५१ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर १०३,९१० रुपये आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७६,१६२ रुपये होती, जी आता १,०२,३८८ रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ या वर्षात सोन्याच्या दरात २६,२२६ रुपयांची (३४.४३%) वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ३१ डिसेंबर २०२४ रोजी एक किलो चांदीचा भाव ८६,०१७ रुपये होता, जो आता १,१७, ५७२ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात या वर्षात ३१,५५५ रुपयांची (३६.६८%) वाढ झाली आहे. मागील आठवडय़ात सोन्याचा भाव ९९ हजार ३५८ रुपये प्रति तोळा होता. तर चांदी ३ हजार ६६६ रुपयांनी महाग झाली आहे. चांदी १ लाख १७ हजार ५७२ रुपये किलो झाली आहे. मागील आठवडय़ात चांदीचा भाव १ लाख १३ हजार ९०६ रुपये होता.
सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरीस चांदीचा भाव १,३०,००० ते १,४६,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय तणावामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळे, यावर्षी सोन्याचा दर १,०४,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो.
टीप – उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात









