सोन्याच्या दराची पुन्हा उसळी! आजचा १० ग्रॅमचा भाव काय?

या कारणामुळे वाढला सोन्याचा भाव, सोने पुन्हा जाणार लाखाच्या पलीकडे?, हा घटक ठरतोय कारणीभूत?

पुणे – मागच्या काही दिवसापासून होणाऱ्या दरवाढीमुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. यामुळे सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात येत आहे.त्यातच मागील काही दिवसापासून उतरणारे सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत.

गेल्या या आठवड्याच्या पहिल्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ९३,६०० रुपयावर होता. त्यात या आठवड्यात मोठी वाढ दिसून आली. आज सोने दर ९६३०० पोहोचले आहे. त्यामुळे या आठवड्यात सोने दरात तब्बल २७०० रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. शुद्ध सोन्याच्या म्हणजेच २४ कॅरेटच्या प्रति १०० ग्रॅम किमतीत तब्बल ५,००० रुपयांनी वाढ झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांना धक्का बसला आहे. या वाढीमागे देशांतर्गत मागणी आणि जागतिक बाजारातील काही महत्त्वाचे घटक जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९८,०८० रुपये झाला आहे, जो कालच्या तुलनेत ५५० रुपयांनी जास्त आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८,९९० रुपये आहे, जो कालच्या ८,९४० रुपयांपेक्षा ५० रुपयांनी जास्त आहे. तर १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही आज प्रति १० ग्रॅम ४१० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीतील वाढ केवळ भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक बाजारातही सोन्याला मागणी वाढत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत आहेत. यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन दरांवर परिणाम होत आहे. तसेच, सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईत भारतात सोन्याची मागणी वाढते, त्याचाही दरांवर परिणाम होत आहे.

शहर आणि सोने दर

मुंबई- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८८,६२३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ९६,६८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे- प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,६२३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये आहे.
नागपूर- २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये इतका आहे.
नाशिक- २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये आहे.