जुलै महिन्याची सुरुवातीलाच सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

महिनाभरात सोन्याच्या दरात इतक्या हजारांची वाढ, चांदीही झळाळली, सोने का महाग झाले, जाणून घ्या नवीन दर?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धावेळी सोन्याचे भाव वाढले होते. पण त्यांच्यात युद्धबंदी झाल्यानंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होत होती. मात्र, मंगळवारी सोन्याने पुन्हा उसळी घेतली असून, भारतात सोन्याच्या किमतीत तब्बल १,१४० रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोने परत उसळी मारणार का? हे पहावे लागेल.

सोने आणि चांदीच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडल्या आहेत. जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या दरात सतत दरवाढीचा कल पाहायला मिळत असताना चांदीच्या दरांमध्येही विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९६०५० रुपये झाला तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८८०४६ रुपये आणि १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७३०७८ रुपये आहे. सोन्याच्या दरवाढीला टॅरिफने देखील पाठिंबा दिला. ९ जुलैची अंतिम मुदत जवळ येताना अमेरिकेच्या टॅरिफ आकारणीबाबत असलेली अनिश्चितता सोन्याच्या किमती वाढण्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,७३३ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,८०० रुपये आहे. दुसरीकडे १ किलो चांदीचा दर १०६,३४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०६३ रुपये आहे.

चांदीच्या दरवाढीचा दर सोन्यापेक्षा चार पट अधिक आहे. सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याचे कारण इराण-इस्त्रायल युद्ध, डॉलरच्या किमतीत घसरण होणे, अमेरिकेतील ट्रेड वॉर आणि व्याजदर, ईटीएफ खरेदीत झालेली वाढ आहे. ३० मे ते ३० जून या काळात सोने २१०३ रुपये महाग झाले आहे.

टीप – शहर आणि विविध कर आकारणीमुळॆ विविध शहरात सोने दरात बदल असू शकतो.