सोन्याच्या दरात चढ-उतार कायम, आजचे दर काय?

सोन्याच्या दरात मोठा बदल, तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे आजचे दर काय?

पुणे – सोने चांदीचे आपल्या भारतीय लोकांना पहिल्यापासून आकर्षण राहिलेले आहे. पण अलीकडे सोन्याचे दर कमालीचे वाढले आहेत. अगदी सोन्याने एक लाखाचाही अप्पाजी ओलांडला होता. पण आता पुन्हा एकदा सोन्याचे दर कमालीचे घसरले आहेत. आता पुन्हा एकदा सोने दरात चढ उतार होत आहेत.

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यानंतर आज हे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा ९७,०४० रुपये आहे. आज सोन्याच्या दरात ४४० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७७,६३२ रुपये आहे. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात चांगलीच घट झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील घसरण झाली आहे. १ तोळा सोने ८८,९५० रुपयांवर विकले जात आहे. आज या दरात ४०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,१६० रुपये आहे. या दरात ३२० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेट सोन्याचे दर ७२,७८० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे भाव ५८,२२४ रुपये आहे. या दरात ३३० रुपयांनी घट झाली आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २९ मे २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,२५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८७,३१३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९७,९०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९७९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती बदलत जातात.
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,१४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,०७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,१४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ९५,०७० रुपये आहे.
नागपूर२४ कॅरेट सोन्याचा दर ९५,०७० रुपये इतका आहे.
नाशिक२४ कॅरेट सोन्याचा दर ९५,०७० रुपये आहे.

सोन्याचे दर दररोज ठरवले जातात. डॉलरच्या किमतीतील चढउतार, कच्च्या तेलाच्या किमती, विनिमय दर यासह अनेक घटक सोने आणि चांदीच्या किमतींवर परिणाम करतात. याशिवाय भारतीय समाजात सोने आणि चांदीला विशेष महत्त्व आहे. हे कोणत्याही कुटुंबासाठी समृद्धीचे प्रतीक मानले जाते.