सोन्याच्या दरात एकाच दिवसात एवढ्या हजाराची घसरण?

इराणचे युद्ध संपताच सोन्याचे भाव पडले, चांदीचा तोरा उतरला, या महिन्यात निचांकी भाव, यामुळे सोने आणखी स्वस्त होणार?

मुंबई – इराण आणि इस्त्रायलच्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पण आता इराण आणि इस्राईल यांच्यात युद्धविराम झाल्यामुळे सोन्याच्या किमती पुन्हा कमी झाल्या आहेत.

सोन्याच्या किमती अडीकडच्या काळात चांगल्याच चर्चेच्या विषय राहिलेल्या आहेत. बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात १०० ग्रॅममागे २७०० रुपयांची घसरण झाली होती. त्यात आणखी घट होणार आहे. आखातात अस्थिरता आल्यानंतर सोने दरवाढ सुरूच होती. त्यात लग्नसराईत सोन्यास मागणी होती. त्यात इराण व इस्राईल युद्धाने दरात वाढ होत होती. यामुळे सोने दरांनी एक लाख रुपयांचा पल्ला गाठला होता. गुरुवार, २६ जून २०२५ रोजी, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९८,९४० रुपये दराने विकले जात आहे, जे एका दिवसापूर्वी ९९,२१० रुपयांवर व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोने ९०,६९० रुपयांना विकले जात आहे तर १८ कॅरेट सोने ७४,२०० रुपयांना विकले जात आहे. त्याचप्रमाणे, चांदी देखील स्वस्त झाली आहे आणि आज ती १,०७,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. एका दिवसापूर्वी चांदी १,०८,९०० रुपयांना विकली जात होती. चांदीची राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये किंमत १,०७,९०० रुपये प्रति किलो आहे. बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, अमरावती, चेन्नई, औरंगाबाद, भोपाळ, भिवंडी आणि गाझियाबाद येथेही चांदीचा दर त्याच दराने व्यवहार होत आहे. सोने आणि चांदीची किंमत दररोज निश्चित केली जाते, त्यामुळे त्यात चढ उतार नेहमीच होत असतात. दरम्यान सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या खिशावरील ताण कमी झाला आहे. या वर्षी सोन्याचा तोरा वाढला आहे. सोन्याने लाखाचा उंबराठा ओलांडल्याने अनेक ग्राहकांनी सराफा बाजाराची वेस काही ओलांडली नाही. पण भाव कमी झाल्यावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे. महत्वाचे म्हणजे मंगळवारी सोने ९७ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. गेल्या बारा दिवसातील सोन्याचे हे निचांकी भाव होते.

सोन्याच्या किमती वाढण्यामागे गेल्या काही महिन्यांत महागाई, आर्थिक अनिश्चितता, आणि युद्धजन्य वातावरण यासारख्या घटकांचा प्रभाव होता. पण आता तशी कोणतीही परिस्थिती नसल्यामुळे त्याचबरोबर सोन्याचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे किमती घसरण्याची शक्यता वाढली आहे.