आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात फेरबदल

जाणून घ्या आजचे दर, एका वर्षात सोन्याचे एवढ्या हजारांनी वाढले दर, पुढील अंदाज काय?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने बदलत आहेत. कधी सोन्याचा किमती वाढतात तर कधी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण सुद्धा होते. दरम्यान आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

बाजारातील अनिश्चितेमुळे सोन्याच्या किमतीत चढ उतार होत आहेत. २४ मेला २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत ५५० रुपयांनी वाढवून ९८ हजार ८० रुपयांवर पोहोचली आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत पाचशे रुपयांनी वाढ होणे ८९ हजार ९०० रुपयांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव या शहरांमध्ये आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९ हजार ५०० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. तसेच नाशिक, वसई विरार, भिवंडी आणि लातूर या शहरांमध्ये आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९, ५३० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज १८ कॅरेट सोन्याची किंमत ७३ हजार २३० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. तसेच नाशिक, वसई विरार, भिवंडी आणि लातूर या शहरांमध्ये आज १८ कॅरेट सोन्याची किंमत ७३,२६० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७ हजार ६४० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, गेल्या एका वर्षात सोन्याने सुमारे ३० टक्के परतावा दिला आहे. दीर्घकालीन बाबींबद्दल बोलायचे झाले तर, २००१ पासून आतापर्यंत सोन्याने सरासरी १५ टक्के CAGR परतावा दिला आहे. १९९५ पासून, सोने दरवर्षी महागाईपेक्षा २-४ टक्के जास्त परतावा देत आहे.