सोने स्वस्त झाले की महाग, जाणून घ्या आजचा भाव

जागतिक बाजाराचा सोन्याच्या किमतीवर परिणाम, सोने खरेदी करण्यापूर्वी बातमी वाचाच!

पुणे – आज सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतीत वाढ दिसून येत आहे. सोन्याची वाढलेली मागणी आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. ९ जुलैपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज दिवसाच्या सुरुवातीला २४ कॅरेट सोने ९८,९०० रुपये प्रति १० ग्रॅम विकले जात आहे. त्याच वेळी, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर ७४,१८० रूपये आहे. त्याचबरोबर इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,४८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ९५,१४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव ७८,९६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्याच वेळी, १४ कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत प्रति १० ग्रॅम ६२,८७० रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे सोन्याची जागतिक किंमत प्रति औंस ०.२८ टक्के किंवा ९.३० डॉलर ने घसरून ३,३४८.१५ डॉलर झाली आहे. पण भारतात मात्र सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, चांदी चांगलाच भाव खात असून चांदीचा दर १ लाख ७ हजार प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील चढउतार, कच्चे तेल, सीमाशुल्क, जागतिक बाजारपेठेत कोणत्याही प्रकारच्या हालचाल, विविध देशातील वाद याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असतो.

टीप – बातमीतील सोन्याच्या किमती विविध वेबसाईटचा संदर्भ घेऊन दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष दुकानात यामध्ये फरक असू शकतो.