अर्थसंकल्पानंतर देशात सोन स्वस्त झाले की महाग?

Oplus_131072

जाणून घ्या भाव कुठेपर्यंत पोहोचला, पहा मुंबई-पुण्यातील ताजे दर, गुंतवणुकीला सोनेच बेस्ट

मुंबई – अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवर आयात शुल्क वाढवले ​​जाऊ शकते, अशी अटकळ यापूर्वी वर्तवली जात होती. पण तसे काहीच न झाल्याने सोन्याचे दर उतरत आहेत.

सोने आणि चांदीच्या दरात घट होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोमवारी म्हणजे आज सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाली. सोनं प्रति १० ग्रॅम ८२०८६ रुपये तर चांदी प्रति किलोग्रॅम ९३५३३ रूपये भाव आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमधील बदल आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित मालमत्तेकडे ओढा यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर कपात आणि आर्थिक अनिश्चितता सुरूच राहिल्यास सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये घट होणार आहे. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क २५% वरून २०% करण्यात आले आहे.
प्लॅटिनमवरील सीमाशुल्क २५% वरून थेट ५% पर्यंत कमी करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली होती.

मुंबई
२४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ८४०५०रु.
२२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ७७०५०रु.
चांदी ९९५०० रु. प्रति किलो ग्रॅम

पुणे
२४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ८४०५०रु.
२२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ७७०५० रु.
चांदी ९९५०० रु. प्रति किलो ग्रॅम