कर्नाटकात जाताय का? मग ही बातमी वाचाच!

कर्नाटकात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण, राज्य सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई – महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसमधील कंडक्टरला कन्नड येत नाही म्हणून मारहाण केली असून , त्याला अन बसला काळ फासल्याची चर्चा सगळेकडे जोरदार सुरु आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

कर्नाटकमध्ये कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला केला आहे . या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाने तात्काळ निर्णय घेतला आहे . या निर्णयात महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली जाणार आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यात कन्नड कार्यकर्त्यांनी एसटी बसच्या चालकाला कन्नड येते का ? असा प्रश्न विचारला पण त्याला कन्नड येत नसल्यामुळे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कंडक्टर आणि बसवर हल्ला केला आहे. लोकांनी त्याच्या तोंडाला काळे फासून बसला देखील काळे फासले आहे. या घटनेमुळे सर्व महाराष्ट्रात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे अजून एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “वाद वाढायला नको, याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. काही गावगुंड प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवत आहेत, हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात देखील कर्नाटकातील बसेस येतात, याचा विचार कर्नाटक सरकारने करावा, असे म्हटले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. या घटनेनंतर चालकाला स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परिणामी महाराष्ट्र आणि कर्नाटकचे सीमावर्ती भाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.