मुलींना अक्कल नसते, त्यांना त्यांचे मतच नसते…

नवीन मालिकेत दिसणारी अभिनेत्री भडकली म्हणाली ‘फक्त १० – २० टक्के महिलांना कदाचित…

मुंबई – बिग बॉस मराठी ५ नंतर जान्हवी किल्लेकर हे नाव महाराष्ट्रात गाजले. तिला टास्क क्विन म्हणून ओळख मिळाली. पण जान्हवीने छोट्या पडद्यापासून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. पण आता पुन्हा एकदा जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लवकरच्या  ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकेत जान्हवी झळकणार आहे याचा खुलासा ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमात झाला आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ च्या नुकत्याच झालेल्या भागात जान्हवी दिसून आली.  पण खरे तर ती जान्हवी किल्लेकरची ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री होणार असल्याचे समोर आले. या मालिकेत ती इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील ही डॅशिंग भूमिका साकारणार आहे. ‘भाग्य दिले तु मला’ या मालिकेत जान्हवी नकारात्मक भूमिकेतून दिसून आली होती. आजवर नकारात्मक भूनिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जान्हवी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या नवीन भूमिकेसाठी उत्सुकता लागली होती. दरम्यान जान्हवीने एक व्हिडीओ पोस्ट करत महिलांना पुरुषांपेक्षा कमी लेखणाऱ्या आणि त्यांच्या ड्रायव्हिंग स्किल्सची खिल्ली उडवणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली होती.

https://www.instagram.com/reel/DEw8SVYKVVa/?igsh=MWtkeGQ4eDE0M2J6Nw==

बिगबॉसनंतर जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसते. ती तिच्या आयुष्यातील अनेक घडामोडी शेअर करत असते. बिग बाॅसमध्ये ती ग्रँड फिनालेपर्यंत आली होती परंतु नंतर तिने ९ लाख रूपये घेऊन बाहेरचा रस्ता निवडला होता.