पावसाळी कामे मार्गी लावा, अन्यथा आंदोलन ; प्रशांत जगताप यांचा इशारा…

पुणे (प्रतिनिधी) – गेल्या ४८ तासात पुण्यात मुसळधार पाऊस झाला आहे . ४८ तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे हडपसर व परिसरातील वाड्यावस्त्यांमध्ये ,घरांमध्ये पाणी शिरले असताना नागरिकांना प्रचंड यातना सोसाव्या लागत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन यांनी जनतेला वारेवर सोडून दिले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली आहे

 

हडपसर व परिसरातील वाड्यावस्त्यांमध्ये ,घरांमध्ये पाणी शिरले असताना लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन याठिकाणी फिरकले सुद्धा नाही. ठिकठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना प्रचंड यातना सोसाव्या लागत आहे. अशा वाईट काळात जनतेला वारेवर सोडून दिल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून समस्या सोडवाव्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी दिला आहे.

 

पुण्यातील मुंढवा, केशवनगर, हडपसर, १५ नंबर, लक्ष्मी कॉलनी, रामटेकडी, एनआयबीएम, कोंढवा ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली व घराघरात पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले, आमदार व पालिका प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर सोडले असताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी गुडघाभर पाण्यात जाऊन पाहणी करत नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने सूचना देऊन नागरिकांना अडचणीतून मुक्त करण्याचे आवाहन यावेळी जगताप यांनी केले आहे.

 

तसेच मांजरी नदीवर नव्याने उड्डाणपूल बांधण्यात आला असून त्याचे उद्घाटनही झाले नसताना पाणी पुलालगत वाहत आहे. त्यामुळे या नवीन पुलाला धोका निर्माण झाला असून येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या पुलासाठी शासनाचा कोट्यावधी निधी उदासीन लोकप्रतिनिधीमुळे पाण्यात गेल्याची टीका प्रशांत जगताप यांनी यावेळी केलीआहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात पावसाळी पूर्व कामे झाली नाहीत, महानगरपालिकेत नगरसेवक नसल्याने जनतेला वाली नाही, आमदारांना जनतेच्या समस्या सोडविण्यात रस नाही यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांची कामे केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशांत जगताप यांनी दिला.