
अकरा हजार जागांसाठी होणार पोलीस भरती, या महिन्यात होणार परिक्षा? मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई – पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात ११ हजार जागांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

मागील ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले आहे. पोलीस भरतीच्या मान्यतेकरीता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल. या भरतीमध्ये बँडमन, चालक शिपाई, पोलिस शिपाई तसेच राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. थोडक्यात तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात, त्याच जिल्ह्यातून अर्ज भरता येईल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचे स्थानिक पातळीवर स्वागत होत असून, या भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर लक्ष ठेवावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यातील हजारो उमेदवार पोलीस भरतीची वाट बघत आहेत. माहीतच असेल पोलीस भरती ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे निश्चितच ही एक दिलासादायक बातमी आहे. या संदर्भाती प्रस्थाव गृह विभाग कडे सादर करण्यात आला आहे.









