तुमच्या वाहनाला आजच HSRP नंबर प्लेट बसवा नाहीतर….

HSRP नंबर प्लेट नसल्यास होणार इतक्या हजाराचा दंड, ही आहे शेवटची तारीख, जबर दंड

मुंबई – भारतात आता HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. सुरक्षा वाढवणे आणि चोरी रोखणे या उद्देशाने सरकारने हा नियम लागू केला आहे. यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर तुमच्या वाहनाला HSRP नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला दंड देखील भरावा लागणार आहे.

जर तुमच्या वाहनाला HSRP नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला चलनाला सामोरे जावे लागू शकते. या चलनाची रक्कम वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असू शकते सरासरी ती ५०० ते ५००० रुपयांपर्यंत असू शकते. मुदतीनंतर तुमच्याकडून १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो असा इशारा परिवहनकडून देण्यात आला आहे. HSRP नसणे हे उल्लंघन मानले जाईल आणि दंड आकारला जाऊ शकतो.
ज्या प्रकरणांमध्ये उल्लंघन फारसे गंभीर नाही तेथे दंड ५००० रुपये देखील असू शकतो.
उल्लंघन खूप गंभीर असेल तर उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी दंड १० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. याशिवाय कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात उल्लंघन झाले त्यानुसार दंडाची रक्कम बदलू शकते. सध्या राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या अंदाजे १ कोटी ३० लाख दुचाकी, २२ ते २५ लाख चार चाकी आणि ४० ते ४५ लाख तीन चाकी गाड्या आहेत. या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायची आहे. यामध्ये मोटर सायकल आणि ट्रॅक्टर साठी ४५० रुपये + १८ टक्के जीएसटी धरून ६९० कोटी होतात, तर चार चाकींसाठी १५० कोटी होतात. तीन चाकींसाठींची रक्कम धरून सुमारे १ हजार कोटींची कमाई राज्य शासनाला होणार आहे.

१ एप्रिल २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना ३१ मार्च २०२५ पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले होते. मात्र आता एचएसआरपी नंबरप्लेटसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ३० एप्रिल २०२५ नंतर रस्त्यावर एचएसआरटी नंबर प्लेट शिवाय वाहन आढळले, तर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.