(हडपसर प्रतिनिधी – तुकाराम गोडसे) – हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची दिवसेंदिवस ताकद वाढत आहे. मतदारसंघांमध्ये मला मानणारा शिवसैनिक व मतदार वर्ग मोठा आहे. मी केलेले विकास कामे आणि मतदारांसोबत माझा मोठा संपर्क आहे. अनेक वर्षापासून मतदार संघामध्ये नागरिकांच्या प्रश्नासाठी केलेले आंदोलन यामुळे सार्वजनिक हितांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला. त्यासोबत गंगाधर बधे यांनी सुद्धा शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून अनेक नागरिकांच्या मदतीला धावून प्रश्न सोडवण्याचे काम केले.आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत. त्यामुळे गंगाधर हेच महादेव आहेत आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत. त्यामुळे मतदारांनी गंगाधर बधे यांना महादेव बाबर समजूनच मोठ्या बहुसंख्येने मतदान करावे. असे माजी आमदार महादेव बाबर यांनी पत्रकार परिषदेत मतदारांना आवाहन केले.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार महादेव बाबर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबर बोलत होते. याप्रसंगी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत महादेव बाबर यांनी सांगितले, हडपसर मतदार संघामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याकरता आम्ही शिवसेना गंगाधर बधे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उभे केले आहे. मतदारसंघांमध्ये मी आमदार असतानाच महत्त्वाचे जे प्रश्न आहेत मांजरी जाण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल करणे, त्यासोबत मांजरी महादेव नगर परिसरामध्ये पाणीटंचाई दूर व्हावी याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची पेयजल योजना पाठपुरावा करून मंजूर करून आणून ठेवली होती.
यानंतर पुढे बाबर म्हणाले, हडपसर मतदार संघामध्ये सोलापूर रोडला पर्याय रस्त करणे, हडपसर रामटेकडी भागांमध्ये संपूर्ण पुणे शहराचा कचरा आणून टाकला जात आहे ते हटवणे आमचे ध्येय आहे, त्याचबरोबर मुंढवा येथे कारखस प्रकल्प जनावरांचा प्रकल्प आणून हडपसरची दयनीय अवस्था करून ठेवली आहे. कचरा आणि जनावरांचा प्रकल्प कारखस प्रकल्प ही घाण हटवून हडपसरला स्वच्छ आणि सुंदर हडपसर करण्याचा आणि ट्राफिक मुक्त हडपसर करण्याचा आमचा संकल्प आहे. मतदारसंघांमध्ये महादेव बाबर यांचे नाव एक नंबरला होते,त्यामुळे मतदारसंघातील अदृश्य कार्यकर्त्यांचे हात गंगाधर बधे यांनाच मदत करणार आहेत. प्रसंगातील सर्वात चर्चेत असलेला मेट्रोचा प्रश्न हा आजही कागदावरच आहे. मुळात मी महापालिकेचा गट नेता होतो तेव्हा दिल्लीला जाऊन शिवसेनेच्या वतीने पुणे शहरात मेट्रो आणण्याचा प्रस्ताव आम्हीच सादर केला होता. त्यामुळे निवडून आल्यानंतर प्रत्यक्षात मेट्रो आणण्याचे काम सुद्धा आम्हीच करणार. असे पत्रकारांच्या विविध प्रश्नाला उत्तर देताना बाबर यांनी उत्तर देत गंगाधर बधे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी सांगितले, मी एक शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ता आहे, माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहे. मागील ३० ते ४० वर्षापासून शिवसेनेत म्हणून काम करत असल्यामुळे मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात माजी आमदार महादेव बाबर यांनी काम केले आहे, त्यासोबत वेगवेगळ्या कष्टकरी वर्गांना व सर्व धर्मातील नागरिकांना मदत करण्याचे काम सुद्धा माझ्या हातून झाले आहे. मतदारसंघांमध्ये निष्ठेने हडपसर चा विकास करण्यासाठी आम्ही दोघांचा पुढाकार आहे. मतदारांना विनंती आहे हडपसरच्या विकास करण्याकरिता ” एअर कंडिशनर ” या चिन्ह समोरील बटन दाबून मला बहुसंख्य मतांनी विजयी करावे.