भुशी डॅममध्ये बुडून चार पर्यटकांचा मृत्यू…बघा काय घडल..?

पुणे प्रतिनिधी : लोणावळा येथे वर्षासहलीसाठी आलेल्या पाच ते सहा पर्यटकांचा भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवार असल्याने भुशी डॅम परिसरामध्ये पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शनिवार-रविवार लागून सुट्टी आल्याने मोठ्या संख्येने पर्यटक भुशी डॅमवर आले आहेत.

        सकाळपासूनच भुशी डॅम परिसरामध्ये पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडालेले सर्व पर्यटक हे बाहेरचे असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने भुशी डॅम परिसरामध्ये पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोणावळा परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्य देशासह राज्यभरातील या ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोणावळा ग्रामीण पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहिल्याच पावसामध्ये भुशी डॅम परिसरामध्ये इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. बॅक वॉटरमध्ये बुडलेल्या पर्यटकांची ओळख अज्ञाप पटलेली नसून पोलिसांकडून त्यांचा तपास केला जात आहे.