हवेली प्रतिनिधी – गौरव कवडे | शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माऊली आबा कटके यांनी आज अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीला नारळ फोडून व आरती करून आपल्या प्रचाराची सुरुवात केली यावेळी शिरूर हवेलीतील ग्रामस्थांनी बैल गाडीत त्यांची मिरवणूक काढत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी सिने अभिनेते सयाजी शिंदे हे प्रचार शुभारंभा वेळी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप व्हालेकर, सुरेश घुले, प्रदीप कंद,दादा पाटील फराटे, सुभाष जगताप मिलिंद हरगुडे ,विलास कुंजीर, शशिकांत गायकवाड, बाळू चौधरी, सुधीर फराटे, राहुल पाचर्णे,अण्णा महाडिक विनायक गायकवाड ,विपुल शितोळे, संदीप भोंडवे, हिरामण काकडे , आप्पासाहेब काळे, प्रशांत काळभोर,नवनाथ काकडे, आबासाहेब काळे, युवराज काकडे, मोहन जवळकर , राहुल भोंडवे , पारस वाल्हेकर काळूराम भोंडवे आदी शिरूर हवेली मधील मान्यवर उपस्थित होते.
शिरूर हवेली मतदारसंघाचा खरा कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचे वारसदार म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी मला द्यावी त्याच सोन करुन शिरूर हवेली तालुक्यातील सर्वसामान्यांच्या स्वप्नातील मतदारसंघ निर्माण करून त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांनी दिली. महायुतीचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते या प्रचारसभेत सहभागी झाले होते. गोरगरीबांची सेवा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मला संधी द्या, अजित पवारांच्या सहकार्यांने कारखाना सुरु करणार असल्याचे आश्वासन माऊली कटके यांनी भर सभेत दिले. यावेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी माऊली कटके यांना जनतेची सेवा करण्यासाठी निवडून द्या असे माध्यमांशी बोलताना सांगितले